शीर्षक :- प्रेमाश्रू ❤️
झाली जेव्हा पहीली
तुझी माझी भेट..
नजरेचे वार आणि
हृदयी तारा जुळल्या थेट..
पहील्या भेटीत असं
काहीच नव्हत कळलंं..
बोलायचं होतं खूप
पण मन नव्हतं वळलं..
निघण्याची वेळ आली
तेव्हा मन झालं उदास..
प्रेमात पडलोत की काय
याचाच झाला एहसास..
दोघेही निरोप घेता
क्षणात वळून पाहीले..
बघता क्षणी दोघांचे
प्रेमाश्रू होते वाहीले..
या प्रेमाश्रूत सर्व
मनातील वाहत गेले..
बोलता प्रेमगोष्टी दोघेही
प्रेमाश्रूत ते वाहत गेले..
प्रीत..❣️
०४/०३/२०२३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा