शीर्षक :- प्रीत..❤️

प्रीत माझी तुझ्यावरती

अळवावरचे पाणी...

तू तर राजा दरबारचा

मी तर गरीबाची राणी..


मनातली ही प्रीत

ओठावरती येईल का..

सांजसंध्येला येऊन तू

मला घेऊन जाईल का..


तोडून सारे बंधन तू

प्रीत अपली जागव..

तहाणलेल्या प्रेमाला

भेटून तहाण भागव..


प्रीत माझी तुझ्यावरची

एकदा भेटून फुलव तू..

स्पर्शाच्या सरीने मग

अंग अंग शहारव तू..


प्रीत अशीच फुलव तू

प्रीत अशीच सजव तू..


- प्रीत..❤️


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिर्षक :- रंग तूझ्या प्रेमाचा..🌺🌿

शीर्षक :- धुंद आज वेली..🌺🌿