शिर्षक :- रंग तूझ्या प्रेमाचा..🌺🌿

 


रंग तूझ्या प्रेमाचा
मला आधीच लागला..
तुझ्या आठवणीत तो
दिवस दिवस सजला..

होता भेट तुझी
नयन रंग सजला..
सावळा कृष्ण जणू
राधेसंग भिजला..

स्पर्श रंग सख्या
तुझ्या मिठीत दिसला..
कळलेच नाही ह्रदय
तुझ्यात कसा गुंतला..

रंगाची काय गरज
प्रेमरंग तुझाच आहे..
कितीही नाही बोल
तू फक्त माझाच आहे..

प्रीत..❣️
०७/०३/२०२३

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीर्षक :- प्रीत..❤️

शीर्षक :- धुंद आज वेली..🌺🌿