शीर्षक :- बट 🌺🌿

 


नागीनवाणी बट तुझी

वार्‍यावर डोलते..

बघून तुला सखे

ह्रदय धक धक बोलते..


नको सखे अशी

केसांची बट मिरवू..

तिरकी नजरेचे वार

नको माझ्यावर गिरवू..


घायाळ होतो ग राणी

तूझ्या या बटीने..

खोच तू तिला कानामागे

हळूच माझ्या वतीने..


होईल आपली भेट

तेव्हा बट घेईन मागे..

नको ती मधात यायला

चुबंन घेताना संगे..


प्रीत..❣️

०३/०३/२०२३

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिर्षक :- रंग तूझ्या प्रेमाचा..🌺🌿

शीर्षक :- प्रीत..❤️

शीर्षक :- धुंद आज वेली..🌺🌿