शीर्षक :- मोर पिसारा..💚🌿
पहिली भेट ठरली होती
तुझी आणि माझी..
पण भेट काय द्यावी मला
यातच घालमेल तुझी..
असं काही द्यावे की
नेहमी लक्षात राहील..
कुणी विचारुही नये
त्याबद्दल असे पाहिल..
ठरलच मग तुझं ते
मोर पिसारा द्यायचा..
कृष्णाकडून राधेला
असाच प्रेम वाहायचा..
टापटीप नेटका
तू पटकन सजला..
सोबतीला काहीच नाही
फक्त मोर पिसारा घेतला..
पहिल्या भेटीतील तो
मोर पिसारा जपला..
पिसार्यासम प्रेमही
कण कण फुलला..
- प्रीत..❤️
१०/०१/२०२३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा