शीर्षक :- आठवणींचा प्रवास..🌺🌿
तूझीच आठवण
मनाची साठवण
सोडता सुटेना
जणू पाठराखण..
हातात हात
तुझीच साथ
कधी मिळेल ती
तुझीच सोबत..
रम्य सायंकाळ
प्रेमाचा तो मेळ
सतावते मला तो
सोबतीचा काळ..
येऊन तू भेट
ह्रदयात तू थेट
ठरणार ती सख्या
भेट आपली ग्रेट..
गजर्याचा सुवास
सोबत तू हवास
खूपच गोड रे
आठवणीचा प्रवास..
प्रीत..❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा