'कृष्ण' - भाग १



 'कृष्ण' - भाग १


'कृष्ण' समजायला वेळ लागतो. त्याच्या नावातच जोडाक्षरे आहेत. दोन्ही अक्षरे एक नाहीत. दोन्ही अक्षरात दुसरे अक्षर जोडून आहेत. 'क' या अक्षराला 'र' हा शब्द आणि 'ष' या अक्षराला 'ण' हा शब्द जोडलेला आहे. 'कृष्ण' या शब्दातही गूढ अर्थ दडलेला आहे. कृष्ण या शब्दात आनंद, त्याग, प्रेम आहे. जो हा शब्द ओठांवर येताच प्रेम दिसायला लागते. सर्व सोबत जोडून असले तरी कृष्णाला त्याग, विभीन्न राहावं लागले. जन्मापासून त्याला शेवट पर्यंत त्याग करावं लागले. जन्म होताच आई-वडीलांचा त्याग, राधासोबत प्रेमाचा त्याग, तर यशोदेच्या मातृप्रेमाचा त्याग त्याला लहानपणीच करावा लागता.


'कृष्ण' या नावाप्रमाणे कृष्णाचे जीवन पण सरळ नव्हते. जन्म होताच कृष्णला आई वडील ,वासुदेव-देवकी यांना सोडावे लागले. का! कंसला घाबरून नव्हे, तर यशोदेला पुत्रसुख प्राप्ती व्हावी यासाठी. 'यशोदा' प्रेमळ मायेची मुर्ती. तिने कठोर तपश्चर्या करून एकदा 'नारायण विष्णु' माझा पुत्र व्हावा हे वचन मागीतले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी, यशोदेची माया, ममता मिळविण्यासाठी कृष्णा मथुरा सोडून गोकुळात आला होता. माता-पुत्राचे प्रेम खरचं खूप सुंदर होते. गोकुळात आणि वृंदावनात कृष्णाच्या लीला बघण्यासारख्या होत्या.


बघूच पुढच्या भागात -

प्रीत..❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिर्षक :- रंग तूझ्या प्रेमाचा..🌺🌿

शीर्षक :- धुंद आज वेली..🌺🌿

शीर्षक :- प्रीत..❤️