रंग तूझ्या प्रेमाचा मला आधीच लागला.. तुझ्या आठवणीत तो दिवस दिवस सजला.. होता भेट तुझी नयन रंग सजला.. सावळा कृष्ण जणू राधेसंग भिजला.. स्पर्श रंग सख्या तुझ्या मिठीत दिसला.. कळलेच नाही ह्रदय तुझ्यात कसा गुंतला.. रंगाची काय गरज प्रेमरंग तुझाच आहे.. कितीही नाही बोल तू फक्त माझाच आहे.. प्रीत..❣️ ०७/०३/२०२३
आठवांनी डोळे अश्रूंनी भरली.. दिसता मनी तू धुंद आज वेली.. आठवणीतही राञ ही सरली.. दिसता स्वप्नी तू धुंद आज वेली.. प्रेमाचे तरंग धुंद आज वेली.. शहारले अंग या भलतेवेळी.. स्पर्शुनी मनाला तू प्रेम भरवी.. धुंद आज वेली तुला बिलगावी.. करूनी प्रणय मन तृप्त झाली.. तुझ्याच येण्याने धुंद आज वेली.. प्रीत..❣️ ०१/०३/२०२३
प्रीत माझी तुझ्यावरती अळवावरचे पाणी... तू तर राजा दरबारचा मी तर गरीबाची राणी.. मनातली ही प्रीत ओठावरती येईल का.. सांजसंध्येला येऊन तू मला घेऊन जाईल का.. तोडून सारे बंधन तू प्रीत अपली जागव.. तहाणलेल्या प्रेमाला भेटून तहाण भागव.. प्रीत माझी तुझ्यावरची एकदा भेटून फुलव तू.. स्पर्शाच्या सरीने मग अंग अंग शहारव तू.. प्रीत अशीच फुलव तू प्रीत अशीच सजव तू.. - प्रीत..❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा