शीर्षक :- ही गुलाबी थंडी..🌺🌿
ही गुलाबी थंडी
अजूनच पडली..🌨️✨
दाट धुक्यात मग
जाऊन लपली..
झाडे स्तब्ध झाले
वेलीही गोठल्यात..
चंद्राला पण चांदण्या
थंडीने कुठे दिसेनात..💫🌟
पक्ष्यांचे तर सोडाच हो..
घरट्याची गोधडी बांधली होती..
पिल्यांसाठी थोडं पाणी
अन् दाणे मांडली होती..
सगळी कडे धुकेच धुके
पसरले या थंडीत..💙
कुणी ना निघाले बाहेर
या कुडकुडणार्या थंडीत..
वाटले आता सर्व संपले
थंडीचे धुके असेच दाडले
मग..
हळुच एक किरण आली सुर्याची..
ओसरू लागली गादी धुक्याची..
पशूपक्षी हसू लागले
झाडे वेली नाचू लागले..🌿
नियमच हो हा..
अंधारा नंतर ऊजेड येणार
संकटानंतर सुखच दिसणार..😊
:- प्रीत..❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा