शीर्षक :- रम्य ती सायंकाळ..🌺🌿
रम्य ती सायंकाळ
वाऱ्याची ती मंद मंद झुळुक..
तुझ्या हातात माझा हात
आणि बोलण्यास तू उत्सुक...
तु निशब्द, मी निशब्द
डोळेच आपले बोलत होते..
घे ना एकदा मिठीत !
मनातल्या मनात वाटत होते...
शांत अशा देखावा
मनालाही सलत होता..
तुझ्या डोळ्याने केला स्पर्श
मनालाही कळत होता...
अंधारत होत्या सावकाश वाटा
निरोप द्यायची वेळ आली..
जाऊ कशी रे सोडून सख्या
मनात वेदनेची कळ आली...
या सायंकाळी जगलेला
प्रत्येक क्षण आठवणीत आहे..
तुझी सोबत मला लाभली
तुझे प्रत्येक क्षण साठवणीत आहे...
-: प्रीत..❤️
खुपच सुंदर शब्द रचना फारच अप्रतिम लेखन
उत्तर द्याहटवाVery nice 👌👌
उत्तर द्याहटवा