पोस्ट्स

शीर्षक :- मोगरा..🌺🌿

इमेज
  गंध फुलांचा असाच गेला वाहून.. गंधीत क्षणात आठवण तुझी राहून.. लाविला मोगरा तुला आवडतो म्हणून.. अंगण फुलविले मोगरा मोगरा माळून.. कित्येक आले फुलपाखरु दुरून दुरून.. पण हा मोगरा तूझ्या आठवात गेला सुकून.. उरला तो गंध सख्या तुलाच स्मरुन.. राधा कृष्णाच्या या प्रेमात विरून... ...प्रीत ❣️

शिर्षक :- रंग तूझ्या प्रेमाचा..🌺🌿

इमेज
  रंग तूझ्या प्रेमाचा मला आधीच लागला.. तुझ्या आठवणीत तो दिवस दिवस सजला.. होता भेट तुझी नयन रंग सजला.. सावळा कृष्ण जणू राधेसंग भिजला.. स्पर्श रंग सख्या तुझ्या मिठीत दिसला.. कळलेच नाही ह्रदय तुझ्यात कसा गुंतला.. रंगाची काय गरज प्रेमरंग तुझाच आहे.. कितीही नाही बोल तू फक्त माझाच आहे.. प्रीत..❣️ ०७/०३/२०२३

शीर्षक :- प्रेमाश्रू ❤️

इमेज
  झाली जेव्हा पहीली तुझी माझी भेट.. नजरेचे वार आणि हृदयी तारा जुळल्या थेट.. पहील्या भेटीत असं काहीच नव्हत कळलंं.. बोलायचं होतं खूप पण मन नव्हतं वळलं.. निघण्याची वेळ आली तेव्हा मन झालं उदास.. प्रेमात पडलोत की काय याचाच झाला एहसास.. दोघेही निरोप घेता क्षणात वळून पाहीले.. बघता क्षणी दोघांचे प्रेमाश्रू होते वाहीले.. या प्रेमाश्रूत सर्व मनातील वाहत गेले.. बोलता प्रेमगोष्टी दोघेही प्रेमाश्रूत ते वाहत गेले.. प्रीत..❣️ ०४/०३/२०२३

शीर्षक :- बट 🌺🌿

इमेज
  नागीनवाणी बट तुझी वार्‍यावर डोलते.. बघून तुला सखे ह्रदय धक धक बोलते.. नको सखे अशी केसांची बट मिरवू.. तिरकी नजरेचे वार नको माझ्यावर गिरवू.. घायाळ होतो ग राणी तूझ्या या बटीने.. खोच तू तिला कानामागे हळूच माझ्या वतीने.. होईल आपली भेट तेव्हा बट घेईन मागे.. नको ती मधात यायला चुबंन घेताना संगे.. प्रीत..❣️ ०३/०३/२०२३

शीर्षक :- धुंद आज वेली..🌺🌿

इमेज
  आठवांनी डोळे अश्रूंनी भरली.. दिसता मनी तू धुंद आज वेली.. आठवणीतही राञ ही सरली.. दिसता स्वप्नी तू धुंद आज वेली.. प्रेमाचे तरंग धुंद आज वेली.. शहारले अंग या भलतेवेळी.. स्पर्शुनी मनाला तू प्रेम भरवी.. धुंद आज वेली तुला बिलगावी.. करूनी प्रणय मन तृप्त झाली.. तुझ्याच येण्याने धुंद आज वेली.. प्रीत..❣️ ०१/०३/२०२३

चारोळी 🌺🌿

इमेज
 

चारोळी..❣️

इमेज