शीर्षक :- नटखट कान्हा..
नटखट कान्हा
राधेला छेडतो..
खडा मारून
मडके फोडतो..
तसच तु रे
मलाही छळतो..
स्वप्नात येऊन
लव्ह यु बोलतो..
बघावे आरशात
तूच तू दिसतो..
बघत राहावे तर
क्षणातच लपतो..
पाटीमागे येऊन
कवेत धरतो..
गालावरच्या केसांना
बाजूला सारतो..
असाच तू
कान्हा नटखट..
प्रेमासाठी तुझी
किती ही खटपट...
- प्रीत..❤️
Nice
उत्तर द्याहटवा